Description
“एखादा लेखक किंवा वक्ता, लिहितो किंवा बोलतो त्याच्या शब्दांना किंमत किती? तर तो ज्या पुराव्यांचा वापर करतो त्या पुराव्यांना आहे तितकीच !” डॉक्टर सुरेन्द्रनाथ सेन यांचे हे वाक्य समकालीन, अस्सल व विश्वसनीय साधनांचे इतिहास लेखनातील महत्व दर्शवणारे आहे. कागदपत्रे, शिलालेख, ताम्रपट, नाणी वगैरे इतिहासाची साधने असली तरी विष्वसनीयतेच्या बाबतीत अस्सलपत्रांचे स्थान सर्वात वरचे आहे. कारण ती त्या काळातील वर्तमान दर्शवणारी असतात. अस्सलपत्रांच्या आधारे आपण इतिहासाच्या खूप जवळ जावून पोहोचू शकतो. त्यामुळे इतिहास लेखनात अस्सलपत्रांना फॉर महत्त्व आहे.
किल्ल्यांचा इतिहास सांगताना अस्सल साधनांचा आधार घेणे जास्त योग्य ठरते. कोणताही इतिहास हा तर्काने नाही, तर पुराव्यांच्या आधारे सांगावा लागतो. शिवाजी महाराजांनी किल्ल्यासंबंधीं लिहिलेली पटरे संख्येने फारच थोड़ी आहेत. पण ती जी उपलब्ध आहेत, त्यातील मजकूर समजून घेण्यात अनेक अडचणी आहेत हे लक्षात आले. त्या अडचणी दूर करण्याकरिता यात बहुतांशी पत्रे मोडी लिपीतील असून वाचकांच्या सोईसाठी मूळ पत्रेच इथे दिलेली आहेत. तसेच त्यांची मराठी लिप्यंतरे ज्या संदर्भ ग्रंथांमध्ये प्रकाशित झाली आहेत त्यांचे संदर्भ, अवघड शब्दांचे सुलभ मराठी अर्थ, पत्राचे सर्वसाधारण स्वरूप आणि पत्राचा सुलभ मराठी अर्थ देऊन शेवटी या पत्रांवरून काही निष्कर्ष काढलेले आहेत. ते शाळकरी मुलांपासून इतिहास संशोधकांपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरतील यात शंका नाही.
Reviews
There are no reviews yet.