Description
मराठी भाषा बोलणाऱ्या सर्वसाधारण वाचकांच्या दृष्टीने देखील या ग्रंथाची गरजा आज फारच आहे. सध्या जिकडेतिकडे, कसलेही प्रश्न विचारण्याचे पीक आले आहे. प्रश्न विचारणे चांगले; कारण जे जिवंतपणाचे लक्षण आहे. परंतु प्रश्न विचारण्यास देखील ज्ञान असावे लागते, हे राजा मिलिंदने आपल्या कृतीने उत्तम रीतीने दाखवून दिले आहे. त्याचप्रमाणे प्रश्नोत्तरे अगर वादविवाद कसे करावेत हेदेखील नागसेनाने सांगितले आहे. विद्वानांची चर्चा निराळी व राजे लोकांची चर्चा निराळी ऐसे नागसेन म्हणतात. कारण विद्वान लोक कडक वाद करूनही एकमेकांवर न रागावता एकमेकांची चूक असल्यास ती मान्य करतात व चर्चेचा समारोप होतो. मात्र चर्चेत विरोध झाल्यास राजे लोक चिडतात व दुसऱ्यास दांडगाईने शासन करावयास उठतात. असा नागसेनाने कथन केलेला अत्यंत मार्मिक फरक सर्व मराठी भाषा बोलणारांनी लक्षात घेणे सध्याच्या वातावरणात अत्यंत निकडीचे आहे.
ज्ञानसंपन्नतेच्या दृष्टीने काय अथवा खुळचट समजुतीचा नि:पात करण्याच्या दृष्टीने काय, या ग्रंथाची बरोबरी कारु शकेल असा ग्रंथच सापडणे अक्षरश: मुश्किल आहे. या ग्रंथाचा इतिहासही तसाच चित्त हरण करणारा आहे. ग्रंथाच्या मूळ लेखनाचा काळ अचूक सांगणे अवघड असेल तरी सुमारे २००० वर्षांपूर्वीचा हा ग्रंथ आहे. निदान ख्रिस्ती इसवी सनापूर्वीचा तारा मूळ ग्रंथ खासच आहे. भगवान बुद्धांच्या महापारिनिर्वाणानांतर सुमारे ५०० वर्षांनी हा ग्रंथ लिहिला गेला, अशीही रुढ़ आख्यायिका आहे. पुढे वयोवृद्ध बौद्ध भिख्खूंनी मूळ ग्रंथाचे भाषांतर मगधी (सध्याच्या बिहारी) भाषेत केले. त्यानंतर हा ग्रंथ पाली भाषेत अनुवादित झाला. पाली भाषेतून तो सिलोन देशाच्या सिंहली भाषेत सुमारे इ. स. १८७७ मध्ये म्हणजे बौद्ध वर्ष २४२० मध्ये प्रथमच प्रसिद्ध झाला. हे कार्य त्यावेळच्या सिलोनी राजा किरती थी राजासिंग यांच्या आश्रयामुळे घडून आले. सिंहली भाषेतील प्रकाशन पाच बौद्धांनी केले. हिनाती कोतुंबर या नामवंत बौद्ध भिख्खूने सदर भाषांतर सिंहली भाषेत केले असल्याने व पुढे त्यावरूनच सदर ग्रंथ निरनिराळ्या भाषांत उपलब्ध झाले.
Reviews
There are no reviews yet.