Description
‘चतुसच्चप्पकासो’ अर्थात ‘चार (आर्य) सत्यावर प्रकाश’ – चार आर्य सत्यांच्या उपदेशालाच ‘ धम्मचक्कप्पवत्तनसुत्त’ असे सुद्धा म्हणतात. भगवान बुद्धांद्वारा हा जगातील प्रथम उपदेश होता जो पच्चवग्गीय भिक्षूंना वाराणसी येथील ‘इसिपतन मिगदाव वनात’ देण्यात आला. संबोधिप्राप्तिपासून ते महापरिनिब्बानापर्यंत पुढील ४५ वर्ष तथागतांनी जे काही ८४ हजार धम्मस्कंधाचा उपदेश केला ते सर्व या ‘चार आर्य सत्यातच’ सामावलेले आहेत. चार आर्य सत्यांना जाणने म्हणजेच भगवान बुद्धांच्या संपूर्ण तत्त्वज्ञानाला, त्यांच्या सिद्धांताला, त्यांच्या संपूर्ण विचाराला जाणने होय. चार आर्य सत्यांचा विषय हा मुळात चार आर्य सत्य व अष्टाङ्गिक मार्गाचे सम्यक ज्ञान होय.
१. दुक्ख अरिय सच्च
२. दुक्ख समुदय अरिय सच्च
३. दुक्ख निरोध अरिय सच्च
४. दुक्ख निरोधगामिनी पटिपदा अरिय सच्च होय.
यातील चवथे आर्य सत्य अर्थात दुक्ख निरोधगामिनी पटिपदा अरिय सच्च यालाच ‘अष्टाङ्गिक मग्ग’ किंवा ” आठ अंगाने युक्त मार्ग’ असे म्हटले आहे. जसे की,
१. सम्मा दिट्ठि २. सम्मा संकप्पो ३. सम्मा वाचा, ४. सम्मा कम्मन्तो, ५. सम्मा आजीवो, ६. सम्मा वायामो, ७. सम्मा सति, ८. सम्मा समाधि. सदर पुस्तकातील विषय समजून घेत असतांना, ‘पालि भाषेतील’ काही विशेष शब्दांचे व बौद्ध सिद्धांतांचे सूक्ष्म विश्लेषण व विवेचन देण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला आहे. ‘चार आर्य सत्याचे’ ज्ञान हे परमोच्च ज्ञान प्राप्तिचे अर्थात ‘निब्बान’ प्राप्तिचे द्वार असून, बौद्ध तत्त्वज्ञानाला व संपूर्ण बौद्ध सिद्धांताला सम्यक प्रकारे जाणण्याकरिता अत्यंत महत्त्वाचे आहे.
Reviews
There are no reviews yet.