Description
पणजे – मालोजीराजे भोसले यांचे पणतू
आजे – शाहजीराजे भोसले यांचे नातू
पिताजी – हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे सुविद्य ज्येष्ठ पुत्र –
छत्रपती श्री संभाजी महाराज हे जसे प्रजाहितदक्ष, प्रजेचे कनवाळू, ‘राज्याभिषेक’ प्राप्त राजे, संस्कृत भाषेचे व भारतीय राजपरंपरेने प्राप्त ‘भारतीय राजनीतीचे सर्वकष उद्गाते ‘बुधभूषण’ नामक, राजनीती ग्रंथाचे लेखक, संस्कृत भाषेचे उद्गाते भाष्यकार, छत्रपती श्रीशिवराय व महाराणी सईबाईसाहेब यांचे सुविद्य व संस्कृत भाषानिपुण छत्रपती संभाजी महाराज यांची वर्णने संस्कृतमध्ये जी उपलब्ध आहेत, त्यांचे अल्पसे दर्शन घडविण्याचा प्रस्तुत संकलनात्मक अल्पसा, यथासाध्य प्रयत्न केला आहे. त्यांच्या ‘बुधभूषण’ ग्रंथात श्रीशम्भुराजे आत्मगौरव शब्दांकित करतात; त्यातील विनम्रता विश्वाधिपती इन्द्रालाही आनंदवील. श्र्लो. १-१५ मध्ये छ. शम्भुराजे स्वत:विषयी म्हणतात,
“तस्यात्मज: शंभुरिति प्रसिद्ध: । समस्त सामन्त शिरोवसन्त: ।
(शिरावतंस:।)
य: काव्य- साहित्य – पुराण – गीत – कोदण्डविद्यार्णव – पारगामी ।”
Reviews
There are no reviews yet.