Description
शरद पवारांची नेहमीच “आयत्या बिळावर नागोबा”!
अशी भूमिका राहिली आहे.
त्यांची ६२ वर्षातील राजकीय वाटचाल अभ्यासल्यास
ते एक भ्रष्ट्राचारी व दरोडेखोर वाटतात. त्यांची सर्वच धोरणे, योजना
या स्वत:चे कुटुंबीय व आप्तस्वकीयांसाठीच असतात.
त्यांचे राज्य, देश व किंबहुना ज्या जातीचे ते आहेत त्यांचेही होऊ शकले नाही.
ही वास्तवता आणि तेवढेच मोठे दुर्दैव ! राजकीय अनैतिकता आणि
सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याचा हां नवा मंत्र
त्यांनी १९७८ मध्ये राज्य व देशाच्या राजकीय पटलावर आणला.
ते कधीही अभ्यासू, बुद्धिमान नेते नव्हते व नाहीत.
अभ्यासू नेते ही त्यांनी स्वत: भक्त व प्रसार माध्यमांतील पॉकेट
पत्रकारांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक तयार केलेली कृत्रिम प्रतिमा आहे.
पुरोगामित्वाचा बुरखा पांघरलेले ते वास्तविक जीवनात
गुन्हेगार, भ्रष्टाचारी राजकारणी आहेत.
जर खरच ते अभ्यासू नेते असते तर देशाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच
समाजकारण, राजकारणाला विधायक व सकारात्मक वळण देऊन
विकासकामांची गती वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे
अपेक्षित होते, मात्र अशा मिळालेल्या अनेक सुवर्णसंधी त्यांची
वर्तणूक व घातकी स्वभावदोष यामुळे त्यांनी त्या गमावल्या.
”शरद पवार म्हणजे यशवंतराव चव्हाण व जनसंघ यांचे
अनैतिक राजकीय अपत्य होय.”
अशी त्यांची समर्पक व्याख्या करता येईल.

Reviews
There are no reviews yet.