Description
आज ज्याप्रमाणे जातिभेद समाजात पसरला आहे, त्याच्यापेक्षा हजार पटींत जातिभेद तेव्हा समाजात रूढ होता. सर्वच समाजाला जातिभेदाचे चटके कमी – जास्त प्रमाणात भोगावे लागत असत. आजच्या तरुण पिढीला डॉ. बाबासाहेब माहीत आहेत – ते फक्त त्यांनी भारताची राज्यघटना लिहिली म्हणून, त्यांची ओळख आहे; पण इथे एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे जर बाबासाहेब झालेच नसते तर, समस्त दलित बांधवांचे काय झाले असते ? कल्पना करणेसुद्धा शक्य नाही. बाबासाहेबांनी राज्यघटनेत विशेष तजवीज करूनही हा समाज पूर्ण सक्षम होत नाही. डॉ. बाबासाहेबांना समाजव्यवस्थेविरुद्ध लढा देताना काय भोग भोगावे लागले असतील याची ही गाथा.
Reviews
There are no reviews yet.