छत्रपती शिवाजीमहाराज स्मृतिग्रंथ

250.00

Out of stock

पुस्तकाचे नाव छत्रपती शिवाजीमहाराज स्मृतिग्रंथ
लेखक प्रमुख संपादक - जयसिंगराव पवार
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १८२
आकार ६ * ९ इंच
वजन ७८० ग्रॅम

Description

छत्रपती शिवाजी महाराजांनी डोंगरकपारीतील सामान्य मावळ्यांत अस्मिता निर्माण करून, स्वराज्याची प्रेरणा दिली.  त्यांच्यात स्वत्वाची जाणीव झाल्यानेच आपल्याहून बलाढ्य शत्रूंशी गनिमिकाव्याने मावळे लढले. स्वराज्याची स्थापना ही केवळ एक ऐतिहासिक घटना नसून एका नव्या विचारयुगाचाही प्रारंभ आहे.

आधुनिक लोकशाहीचा युरोपमध्ये जेव्हा जन्मही झाला नव्हता, अशा सतराव्या शतकात, शिवरायांनी लोकशाहीला अभिप्रेत असणाऱ्या कल्याणकारी राजवटीचे अधिष्ठान राजेशाहीला दिले. रयतेला परकीय जोखडातून, गुलामगिरीतून तसेच एतद्देशीय वतनदारांच्या जुलमातूनही मुक्त केले. त्यासाठी वतनदारी नष्ट करून, नवी नोकरशाही निर्माण करून शिवरायांनी राज्यकारभार केला. न्यायापुढे सर्व लोक समान आहेत, हे सूत्र स्वीकारून त्याबाबतीत त्यांनी कोणाचाही मुलाहिजा ठेवला नाही.

सामाजिक समानता व धर्मनिरपेक्षता या आधुनिक जीवनमूल्यांचा त्यांनी स्वीकार केला होता. मध्ययुगीन भारताच्या पार्श्वभूमीवर ही एक महत्त्वाची मानवी इतिहासातील क्रांतिकारक घटना आहे. अनेक जगप्रसिद्ध इतिहासकारांनी महाराजांच्या ऐतिहासिक कार्याची चिकित्सा करून जगाच्या इतिहासावर ठसा उमटवलेल्या अनेक ऐतिहासिक व्यक्तींची शिवरायांशी तुलना केली आहे. ह्या सर्वांहून महाराजांचे व्यक्तिमत्त्व हे भिन्न व श्रेष्ठ आहे.

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे समस्त मराठी मुलखाचेच नव्हे तर अखिल भारतवर्षाचे प्रेरणास्थान. आजच्या मराठी समाजाचे व संस्कृतीचे मूळ अधिष्ठान शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यात पाहायला मिळते.  साढेतीनशे वर्षांपूर्वी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपल्या मायभूमीच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेतला आणि मोठ्या जिद्दीने, तसेच पराक्रमाने, त्यांनी आपल्या मायभूमीच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेतला आणि मोठ्या जिद्दीने, तसेच पराक्रमाने, त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यानी निर्माण केलेले राज्य हे काही वतनदारांच्या अथवा जहागीरदारांच्या सुखसमृद्धीसाठी नव्हते, तर ते सामान्य रयतेच्या कल्याणासाठी स्थापन झाले होते.  या राज्याच्या प्रशासनासाठी त्यांनी निर्माण केलेले दंडक आजही लोकशाहीच्या युगात प्रेरणादायी व आदर्शभूत ठरावेत असे होते आणि म्हणूनच त्यांचे चरित्र, त्यांचा लोककल्याणी कारभार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा धर्मनिरपेक्ष व मानवतावादी दृष्टिकोण यांचा परिचय महाराष्ट्रातील शाळांमधील विद्यार्थीवर्ग व शिक्षकवर्ग यांना व्हावा, एवढेच नव्हे तर समाजातील अन्य इतिहासप्रेमी वर्गांनाही व्हावा, तसेच एरवी सहजासहजी उपलब्ध न होऊ शकणारे शिवचरित्र – साहित्य त्यांना वाचण्यास मिळावे, या उद्देशाने या स्मृतिग्रंथाची रचना केली आहे.

नव्या विचारयुगाचा प्रारंभ करणारा एक युगकर्ता, राष्ट्रनिर्माता म्हणून छत्रपती शिवाजीमहाराजांची ओळख करून देण्याचा प्रयत्न या स्मृतिग्रंथात इतिहासकार, विचारवंतांनी आपल्या लेखांद्वारे केला आहे.  महाराजांच्या सर्वच जीवनपैलूंवर प्रकाश टाकणे कठीण आहे, तरीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मुख्य गाभा समजण्यासाठी हा स्मृतिग्रंथ मार्गदर्शक ठरेल.  

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “छत्रपती शिवाजीमहाराज स्मृतिग्रंथ”

Your email address will not be published. Required fields are marked *