Description
भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यात केलेल्या संशोधनाबद्दल मेरी क्युरीला दोनदा नोबेल पारितोषिक मिळालं. साधेपणा, मानवतावाद आणि विज्ञानाबद्दलची तळमळ असलेली मेरी क्युरी ही दोन वेगवेगळ्या क्षेत्रांत नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिलीच स्त्री होती. रेडियम आणि पोलोनियम या मूलद्रव्याचा शोध लावणाऱ्या मेरीनं अणुविज्ञानाच्या प्रगतीची वाट मोकळी करून दिली.
आयुष्यभर साधी राहणी स्वीकारलेल्या मेरीचा विज्ञानवादी दृष्टीकोन असल्यानं टी जन्मभर निरीश्वरवादीच राहिली. विश्वाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या जगावेगळ्या मेरी आणि प्येर या दाम्पत्यानं रेडियमचं पेटंट देखील घेण्याचा मोह कधी बाळगला नाही. कारण स्वत:चा स्वार्थ जपण्यापेक्षा संपूर्ण मानवजातीला हे वैज्ञानिक शोध खुले करून ठेवले पाहिजेत असं त्यांना वाटे.
Reviews
There are no reviews yet.