Description
‘स्मृतिस्थळांच्या अनुषंगाने’ हे पुस्तक वाचले आणि लेखिका मेघा टिळेकर यांच्या लिखाणातून साकारलेले शब्दरूप चित्रण डोळ्यांपुढे उभे राहिले. फुले दांपत्यावर विविध भाषांमध्ये विपुल प्रमाणात साहित्य आहे. परंतु स्मृतिस्थळांच्या अनुषंगाने महात्मा ज्योतीराव आणि सावित्रीबाईंच्या कार्याचा वेध घेणारे हे पहिलेच पुस्तक आमच्या वाचनात आले आहे. लेखिकेने केलेला हा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे. महात्मा फुलेंचे मूळ गाव असलेले कटगुण तसेच खानवडी, फुलेवाडा, नेवसे पाटील वाडा, भिडेवाडा, महात्मा फुले मंडई आदी स्थळांचा इतिहास आणि त्याचबरोबर फुले दांपत्याचे चरीत्र अभ्यासपूर्ण आणि अतिशय आत्मीयतेने लिहिले आहे. काही महत्त्वाच्या प्रसंगांचे रंजकतेने वर्णन करताना केलेले शब्दांकन वाचकाला गुंतवून ठेवते. आपण तिथे प्रत्यक्ष त्या स्मृतिस्थळांना भेट देतो आहोत असे काही ठिकाणी भासते. हे पुस्तक अभ्यासक, पर्यटक, संशोधक आणि विद्याथी वर्गासाठी उपयुक्त आहे. सध्या हाती असलेल्या शक्यतो सगळ्या साधनांचे सखोल अवलोकन करून लेखिकेने ‘स्मृतिस्थळांच्या अनुषंगाने’ हे पुस्तक लिहिले आहे.
Reviews
There are no reviews yet.