Description
भ. बुद्धांनी आपला धम्म संवाद रूपाने सांगितला आहे. त्यावेळी छपाई नव्हती. लेखन साहित्यही दुर्मिळच. त्यामुळे हे धम्म-ज्ञान तोंडपाठ केले जाई. भ. बुद्धांच्या महानिर्वाणानंतर सुमारे पन्नास वर्षांनंतर बुद्धांच्या शिष्यांना तोंडपाठ असलेले धम्म संवाद (निकाये) तयार करण्यात आले. पुढे क्रमाक्रमाने त्रिपीटक बनले. काही निकायात खुद्द भगवंताची वाणी तर इतर काही निकायांमध्ये बुद्धांच्या प्रसिद्ध शिष्यगणांचीही वाणी जोडण्यात आली. त्रिपीटक बनविण्याचे कार्य उत्तर भारतात, लंकेत, चीनमध्ये व मध्य भारतातही झाले, असे निरनिराळ्या इतिहासकारांचे म्हणणे आहे. युरोपियन लेखकांनीही बुद्धांचे धम्मज्ञान निरनिराळ्या आधुनिक भाषांत प्रसिद्ध केले आहे. तेव्हा गेल्या अडीच हजार वर्षांच्या प्रदीर्घ काळांत, निरनिराळ्या लेखकांकडून भगवान बुद्धाच्या धम्माचे भाषांतरित संपादन झालेले आहे.
Reviews
There are no reviews yet.