Description
मोतीचंद्र यांनी या ग्रंथात भारतीय व्यापाऱ्यांच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अनेक सुरस कथा सांगितल्या आहेत. व्यापारउदीमाच्या निमित्ताने झालेल्या अशा प्रवासांनी आर्थिक लाभाबरोबर धर्म व कलेचा प्रसार साधला आणि यादरम्यान देशादेशांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाणही झाली हे महत्त्वाचे.
मोहेंजोदडो आणि हडप्पा संस्कृतींच्या काळापासून 11 व्या शतकापर्यंतच्या व्यापाराची ही माहिती भारतात आणि अन्य ठिकाणी मिळालेल्या भक्कम पुराव्यांवर आधारलेली आहे आणि तिला बौद्ध व जैन कथा-साहित्याने सबळ पुष्टि दिली आहे. हा इतिहास केवळ भारतीय व्यापाराचा नसून तो प्राचीन भारताच्या बदलत्या राजकीय व सामाजिक प्रवाहांचे एक उत्कृष्ट चित्रणही ठरतो.
Reviews
There are no reviews yet.