Description
हिंदू कोड बिल यावर वर्तमानपत्रातून जेव्ह जेव्हा संदर्भ देण्यात येत तेव्हा तेव्हा त्याला ‘ आंबेडकर स्मृती’ असे संबोधण्यात येत असे. आंबेडकर कायदेमंत्री म्हणून हिंदू कोडला कायदेशीर भाषेची लेणी लेवविण्याचे प्रमुख काम त्यांच्याकडे आले होते. ते काम ते अत्यंत काळजीपूर्वक व सचोटीने करीत होते. त्या दिवसांत त्यांची प्रकृती बिघडत चालली हाती, तरीही ते आपल्या नेहमीच्या अवाढव्य कार्यपिपासू वृत्तीने, इतर कामाच्या ओझ्याखालीसुद्धा, ‘हिंदू कोड’ साठी खूप मेहनत घेत असत. हजारो विरोधकांशी चर्चा करून त्यांची बाजू कशी चुकीची आहे व समाजाला हानीकारक आहे, हे पटवून देण्याचे ते मनापासून प्रयत्न करीत होते. राज्यघटना व हिंदू कायदा ही दोन बहुमोल व चिरंजीव देणी आपण भारताला देत आहोत, ही जाणीव त्यांना कार्यप्रवृत्तीचे बळ देत होती. हीच जाणीव त्यांच्या उत्तुंग महत्त्वाकांक्षेला पोषक होती. हिंदू कायदा सर्वांगसुंदर व्हावा म्हणून ते प्रत्येक कलम नीट तपासून पुन:पुन्हा लिहून काढीत असत. अशा रीतीने प्रचंड परिश्रम करून त्यांनी हे बिल तयार केले.
Reviews
There are no reviews yet.