Description
तेराव्या शतकापासून तर आजपर्यंत संतांची वाणी मराठी मनाला रिझवित आहे. ‘ज्ञानदेवे रचिला पाया । तुका झालासे कळस’ या वचनाप्रमाणे भागवतधर्माचा पाया संत ज्ञानेश्र्वरांनी घातला, तर या मंदिराला कळसाला नेण्याचे महदभाग्य संत तुकोबांना लाभले. संत तुकोबांचा कालखंड परकीयांच्या आक्रमणाखाली होता. समाजात अनंत प्रश्नांची बजबजपुरी नांदत होती. उदा. चातुर्वर्ण्य समाजव्यवस्था, कर्मकांड, जपतप, पूजाअर्चा, अंधश्रद्धा, बुवाबाजी, कर्मठ ब्राह्मणाचे वर्चस्व अशा स्थितीत सर्वसामान्य माणूस दिशाहीन झाला होता. अशा समाजाला जागृत करण्यासाठी सतराव्या शतकात अस्सल मराठी भाषेतून अभंगरचना करून वारकरी संप्रदायाच्या विकासाचा परमोच्च बिंदू संत तुकोबांनी साधला.
Reviews
There are no reviews yet.