Description
आपल्याला प्रिय असलेले हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीय जनतेने जो लढा दिला त्याच्या इतिहासाकडे मांगे वळून पाहण्याला हे उचित अवसर आहे. हे स्वातंत्र्य कमावण्यासाठी अनेकांचे परिश्रम आणि रक्त खर्ची पडले आहे ही गोष्ट आपण स्वतंत्र भारताच्या नागरिकांनी जाणली पाहिजे. स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्या लक्षावधी लोकांनी व त्यांच्या नेत्यांनी हाल अपेष्टा सोसल्या व सर्वस्वाचा त्याग केला त्यांना आदरांजली वाहण्यासाठी ह्या ग्रंथाची योजना करण्यात आली.
परंतु हे काम सोपे नव्हते. तशी आपल्या स्वातंत्र्य चळवळीची रूपरेखा सर्वांना माहीत आहे. तथापि ह्या लढ्याचा इतिहास, त्यातील सर्व छटांसह व सखोल आशयासह, संक्षिप्त रूपात सांगणे आणि ह्या लढ्याला हातभार लावणाऱ्या भिन्नभिन्न शक्तींचे व प्रवृत्तींचे समर्पक चित्र रेखणे, बऱ्याच अध्ययनाशिवाय व कौशल्याशिवाय शक्य नव्हते. दूसरे म्हणजे, हा ग्रंथ विद्वानांसाठी संशोधन ग्रंथ न बनवता सामान्य वाचकांनी, विशेषत: तरुण पिढीने, वाचण्यासारखा ग्रंथ आहे.
फार वर्षांपूर्वी आम्ही नियतीला एक वचन दिले होते. ते पुरे होण्याची वेळ आता आली आहे. पूर्णपणे नव्हे; तरी बऱ्याच अंशी. आज बरोबर मध्यरात्री जग झोपलेले असेल तेव्हा भारत जागा होईल, स्वातंत्र्याच्या प्रकाशात, नवे जीवन घेऊन.
Reviews
There are no reviews yet.