Description
सयाजीराव गायकवाड (1868 – 1939) हे ब्रिटिशांकित बडोदा संस्थानचे राजे. उदारमतवादी पुरस्कर्ते, पुरोगामी, सुधारक राजे म्हणून त्यांची ख्याती होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी शाळा सुरू केल्या, ग्रंथालये स्थापन केली, ग्रामपंचायतीचा कारभार सुरू केला. सहकारी पतपेढया काढल्या, ग्रंथ प्रकाशनांना प्रोत्साहन दिले, अस्पृश्यता दूर करण्यासाठी कायदे केले आणि बालविवाहबंदी, विधवाविवाह मान्यता, स्त्रीशिक्षण आदी समाजात बदल घडवून आणणारी कार्ये केली. रोमेश चंद्र दत्त, श्री. अरविंद घोष, डॉ. बाबासाहेब यांसारखे थोर पुरूष महाराजांच्या दरबारी काही काळ राहिले, हे त्यांच्या गुणग्राहकतेचे द्योतक.
व्ही. के. चावडा हे महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, वडोदरा, येथे इतिहासाचे प्राध्यापक होते.
सं. गं. मालशे (24 सप्टेंबर 1921 – 7 जुलै 1992) हे सुप्रसिद्ध मराठी समीक्षक, आगळ वेगळ, ऋणानुबंधास्या गाठी, गतकाल शोधताना, आवडनिवड, केशवसुतांच्या कवितांचे हस्तलिखित, संतार्पण, नीरक्षीर इत्यादी त्यांचे काही ग्रंथ. मराठी भाषा आणि साहित्याचे साक्षेपी अध्यापक म्हणून त्यांनी लौकिक मिळविला. व्ही. के. चावडा
Reviews
There are no reviews yet.