Description
गेल्या पन्नास-साठ वर्षात ज्ञानाची वाढ इतक्या झपाट्याने होत आहे, ज्ञानाच्या कक्षा इतक्या वेगाने विस्तारत आहेत की ते विचार, ते प्रयोग शब्दबद्ध करणे इंग्रजी भाषेलाही कठीण जात आहे. तरीसुद्धा इंग्रजी भाषेमध्ये तितक्याच वेगाने नवीन शब्दांची भर घातली जात आहे, नविन विचार जनसामांन्यांपर्यंत आणि त्या त्या विषयाच्या तज्ञापर्यंत तत्परतेने पोचविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मराठी भाषा भारतातील एक प्रगल्भ भाषा आहे. ऐतिहासिक काळातील मराठी आणि आजचे मराठी यांत बरेच अंतर पडले आहे. याचाच अर्थ ज्ञान-विज्ञानातील नवनवीन संकल्पना व्यक्त करण्याची मराठीची क्षमता सातत्याने वाढवली जात आहेत. समाजशास्त, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान वगैरे शास्त्रांमध्ये मराठीचा वापर मोठ्या प्रमाणात होत असला तरी भौतिक, रसायन, वनस्पती, स्थापत्य, वैद्यक इत्यादी वैज्ञानिक व तांत्रिक विषयांची शब्दसंपत्ती मात्र तेवढ्या प्रमाणात वाढलेली नाही. ही परिभाषा सहजासहजी उपलब्ध होणारीही नाही.
Reviews
There are no reviews yet.