Description
अहमदनगरच्या वाड्मयोपासक मंडळाने 1934 मध्ये ” श्रीज्ञानेश्वरदर्शन ” हा दोन खंडातील बृहद ग्रंथ प्रकाशित केला. या निर्मितीमागे मंडळाच्या प्रयत्नांबरोबर अनेकांच्या भावनाही गुंतल्या होत्या. भाविक आस्वादक आणि चिकित्सकांनी एकत्र येऊन ” श्रीज्ञानेश्वरदर्शन ” ची निर्मिती केली. असा सामूहिक प्रयत्न ” श्रीज्ञानेश्वरदर्शन ” च्या निर्मितीपूर्वी आणि नंतरही झाला नाही; हे एक वास्तव आहे.
” श्रीज्ञानेश्वरदर्शन ” ची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या ग्रंथांतून श्रद्धा आणि चिकित्सा, विद्वत्ता आणि रसिकता, आकलन आणि आस्वाद; तसेच धर्म आणि शास्त्र, साहित्य आणि विज्ञान, समीक्षा आणि संशोधन यांचा प्रत्यय येतो. ज्ञानेश्वरांच्या वाङ्मयाचा अनेक प्रकारे आणि पद्धतीने अभ्यास होऊ शकतो, हे श्रीज्ञानेश्वरदर्शन ने सर्वप्रथम दाखवून दिले. विषय प्रतिपादन, चिकित्सा आणि नवार्थ विचार अशा अनेक दृष्टींनी हा ग्रंथ मौलिक आहे. या ग्रंथाने “ज्ञानेश्वरी” विषयक अभ्यास परंपरेत स्वत:ची स्वतंत्र मुद्रा उमटवली. अर्वाचीन काळामध्ये ज्ञानदेवांविषयक अभ्यासाचा पाया रचला. अशा या “ज्ञानेश्वरी”’ अभ्यासातील दीपस्तंभाचे महत्त्व आज आणि उद्या उद्याही असणार आहे.
Reviews
There are no reviews yet.