श्रीज्ञानेश्वरदर्शन : भाग पहिला

350.00

1 in stock

पुस्तकाचे नाव श्रीज्ञानेश्वरदर्शन : भाग पहिला
लेखक नरहर बाळकृष्ण देशमुख, शिरीष राजाराम लांडगे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या ७०८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ९९१ ग्रॅम

Description

श्रीज्ञानेश्वरांच्या चरणस्पर्शाने जी भूमी पुनीत झाली, संपूर्ण आबालवृद्धांस योग्य दिशा दाखविणारे विचार त्यांच्या मनश्चक्षूंपुढे ज्या भूमीत खेळत होते, त्यांच्या अंत:करणातील तळमळ व प्रेम ही ” अमृतातेंही  पैजा जिंकणाऱ्या मराठीच्या खड्या बोलांत ” ज्या भूमीत बाहेर पडली व अंत:स्फूर्तीने स्फूर्त झालेला दिव्य संदेश ज्या भुमीत गर्जू लागला त्याच भुमीत वास्तव्य करणारा – मग तो साहित्यसेवक असो अथवा सांप्रदायिक दास असो – श्रीज्ञानेश्वरांच्या पुण्यस्मरणाचे कधीही विस्मरण होऊ देणार नाही. ज्या परम थोर जीवात्म्याने अवतार घेऊन जनतेसाठी कष्ट सोसले, तिला योग्य वळण लावून बलवान व चिरकाल शांती प्राप्त करून देण्याचा मार्ग दाखवून दिला, कर्तव्यनिष्ठा जागृत करणाऱ्या भक्तिमार्गाचे तिला आकलन व्हावे याविषयी अहर्निश प्रयत्न केले व ज्यांचे फल आजही 600 वर्षांनंतर दिसून येत आहे, त्यांचे आदरपूर्वक स्मरण करून त्यांच्या कार्याची जाणीव जनतेस देऊन श्रीज्ञानेश्वरांच्या पुण्यस्मरणाचा जयजयकार अंत:करणातील शुद्ध प्रेमाने करण्याचा उमाळा कोणाही साहित्यसेवकास व ज्ञानेश्वर भक्तास येणारच. याच उमाळ्याने श्रीज्ञानेश्वरांचे स्मरण अखंड राहावे, त्यांचे कार्य नित्य डोळ्यांपुढे दिसावे, त्यांनी, घालून दिलेला मार्ग पुन्हा जिकडे तिकडे उज्ज्वल स्वरूपात प्रकट व्हावा, अंत:करणातील भक्ती जनताजनार्दनाच्या सेवेच्या रुपाने श्रीज्ञानराजांच्या  चरणी अखंड लागावी याच एका शुद्ध हेतु.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “श्रीज्ञानेश्वरदर्शन : भाग पहिला”

Your email address will not be published. Required fields are marked *