Description
संत तुकाराम महाराजांवर पहिला विस्तृत चरित्रग्रंथ गुरुवर्य केळूसकरांनी 120 वर्षांपूर्वी लिहिला. तुकारामबावांचे चरित्र या नावाने तो प्रकाशित झाला. दाते ग्रंथसूचीवरून आणि केळूसकरांच्या आत्मचरित्रावरून वरील माहिती समोर आली. केळूसकरांनी तुकाराम चरित्र लिहायला घेतले त्यावेळी ते गीतेवरील टीका लिहीत होते. त्या काळात कवी महीपतीने लिहिलेले संत तुकारामांचे ओवीबद्ध चरित्र आणि एका यूरोपियन गृहस्थाचा इंग्रजी लेख उपलब्ध होता. या दोन संदर्भाशिवाय संत तुकाराम यांच्यासंबंधी इतर साहित्य उपलब्ध नव्हते. लक्ष्मण पांडुरंग नागवेकर यांच्या ‘आध्यात्मिक ज्ञानरत्नावली’ च्या मासिकात तुकारामबावांचे चरित्र 10 पाने आणि गीतेवरील टीका 40 पाने प्रत्येक महिन्याला केळूसकर लिहू लागले.
Reviews
There are no reviews yet.