राज्यघटना, मनुस्मृती आणि रा. स्व. संघ
₹350.00 ₹315.00
8 in stock
पुस्तकाचे नाव |
राज्यघटना, मनुस्मृती आणि रा. स्व. संघ |
लेखक |
मनोहर पाटील |
भाषा |
मराठी |
पुस्तक बांधणी |
पेपरबॅक |
पानांची संख्या |
३४४ |
आकार |
५.५ * ८.५ इंच |
वजन |
४३० ग्रॅम |
Description
गेल्या दोन – चार महिन्यात दोन अकल्पित घटना घडल्या. पहिली घटना अशी की वामन मेश्राम यांच्या नेतृत्त्वाखाली बामसेफचा नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर प्रचंड जुलूस निघाला. दुसरी घटना दिल्लीला घडली. केजरीवाल यांच्या सरकारमधील समाज कल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी काही हजार लोकांना घेऊन बौद्ध धर्माचा बावीस प्रतिज्ञेसहित स्वीकार केला. या दोन्ही घटनांमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दुनियेत फार खळबळ उडाली. याचा परिणाम असा झाला की, सरसंघचालक मोहनराव भागवत माणसासारखी भाषा बोलू लागले. ते बोलले की वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था या कालबाह्य गोष्टी आहेत. या व्यवस्थेच्या जंजाळात अडकून राहणे चांगले नाही. पुढे ते असेही म्हणाले की, जाती या पंडितांनी निर्माण केल्या आहेत आणि या बाबत त्यांनी प्रायश्चित केले पाहिजे. एवढेच नव्हे तर त्यांनी असे सुद्धा म्हटले की हिंदू धर्मग्रंथांच्या समीक्षेची वेळ आली आहे. या सर्व विधानांचा अर्थ असा लावला जाण्याची शक्यता आहे की सरसंघचालकांना समतेचा विचार पटू लागला आहे; पण ही गोष्ट खरी नाही. भारतीय राज्यघटना समतेचा पुरस्कार करणारा पहिला स्वदेशी दस्त ऐवज आहे या ऐवजाचे जतन झाले पाहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे, राज्यघटना संपवण्याची भाषा दुर्दैवी आहे ऐसे सरसंघचालक आजतागायत एकदाही बोलले नाही. संघवाले वेळीअवेळी राज्यघटना नष्ट करण्याची भाषा बोलतात पण सरसंघचालकांनी याविषयी कधीही नापसंती व्यक्त केली नाही. इतकेच नव्हे तर दिल्लीला संघावाल्यांनी राज्यघटनेचे जाहीर दहन केले पण सरसंघचालकांनी याबाबत कधीही खेद व्यक्त केला नाही. त्यांच्या उपरोक्त विधानातील आणि त्यांच्या प्रत्यक्ष कृतीतील विसंगतीचा काय अर्थ लावावा ?
Reviews
There are no reviews yet.