मौलाना आझाद

130.00

Out of stock

पुस्तकाचे नाव मौलाना आझाद
लेखक नंदू गुरव
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ७६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १८८ ग्रॅम

Description

मक्केत जन्मलेला व भारतात वाढलेला एक मुलगा ‘सोळावं वरीस’ गाठण्यापूर्वीच चांगला शिक्षक, विद्वान पंडित, कवी, निबंधकार, अनुवादक आणि वक्ता म्हणून लौकिक कमावतो. अठराव्या वर्षी धर्मशास्त्रातील पीएच.डी. संपादित करतो. आपले उर्वरित आयुष्य आपल्या धर्मबांधवांना पुराणमतवादी, कडव्या मुल्ला-मौलवींच्या प्रभावातून मुक्त करून त्यांना इस्लामचा, नव्या जगाचा, नव्या भारताचा आधुनिक चेहरा दाखवण्यासाठी खर्च करतो. हिंदू व मुसलमान ही दोन वेगळी राष्ट्र नाहीत, असं जीव तोडून सांगत फाळणीला प्राणपणाने विरोध करतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाचा पहिला शिक्षणमंत्री म्हणून नवभारताचा शैक्षणिक पाया रचतो. निर्भीड विचारवंत, झुंजार पत्रकार, स्त्रीहक्कांचा कैवारी, क्रांतिकारकांपासून महात्मा गांधींपर्यंत अनेक देशभक्तांचा मित्र, गांधीजींच्या ‘नई तालीम’ या क्रांतिकारी शिक्षणपद्धतीचा पुरस्कर्ता… अशी विविधांगी ओळख असणारे मौलाना आझाद. अतिशय ओघवत्या भाषेत लिहिलेल त्यांचं हे चरित्र द्वेष आणि वैचारिक गोंधळाने गढूळ झालेल्या आजच्या काळात युवकांनीच नव्हे, तर सर्वांनी वाचायलाच हवं. 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मौलाना आझाद”

Your email address will not be published. Required fields are marked *