Description
विसाव्या व्या शतकावर प्रभाव टाकणारे महत्वाचे मराठी नाव म्हणजे ‘विनोबा’. पण नव्या पिढीला त्यांची ओळखच नाही. जुनी पिढी त्यांना ‘आणीबाणीचे समर्थक’ अशा चुकीच्या कारणाने लक्षात ठेवते. सूर्यासारखी स्वयंप्रकाशित प्रज्ञा लाभलेले हे व्यक्तित्व – व्यापक, तितकेच खोल. प्रकांडपंडित, तसेच कर्मायोगीही. अनेक धर्मग्रंथांचे अध्ययन करून त्यांचे सार काढणारे. गांधीजींनी निवडलेले पहिले सत्याग्रही. गांधींच्या शिष्यांमधील त्यांची समीक्षा करू धजणारे एकमेव. सत्तावीस भाषांचे जाणकार. मराठीतील अतिशय महत्त्वाचे शैलीदार लेखक व ह्या तत्त्वज्ञानावरील ‘गीताई’ या ‘बेस्टसेलर’, काव्यरूप पुस्तकाचे लेखक. ७०,००० कि.मी.ची पदयात्रा करून ४२ लाख एकर जमीन मिळविणाऱ्या ‘भूदान चळवळी’चे प्रवर्तक. गांधीजींचे अहिंसक क्रांतीचे तत्त्वज्ञान अधिक समृद्ध करणारे ‘साम्ययोगी’. स्त्रियांनाही अध्यात्माचा अधिकार आहे. असे आग्रहाने मांडून त्यासाठी ‘ब्रह्मविद्यामंदिर’ स्थापणारे विनोबा. ग्लोबल ते लोकल राजकारणाची उत्तम जाण असणारे आणि ‘नव्या युगात धर्म आणि राजकारण नव्हे, तर अध्यात्म आणि विज्ञान राहील’ असे सांगणारे विनोबा.
विनोबांचे हे विविधरूपदर्शन घडविले आहे त्यांच्या कार्यभूमीत वाढलेल्या लेखिकेने व तेही अतिशय सोप्या प्रसन्न शैलीत. सर्व वयाच्या वाचकांना विनोबा समजून घेण्यासाठी हे पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल.
गांधी-१५०च्या निमित्ताने युवा पिढीला नवभारताच्या निर्मात्यांची तोंडओळख करून देणाऱ्या ‘गांधीजन चरित्रमाले तील एक महत्त्वाचे पुष्प ....
Reviews
There are no reviews yet.