Description
” स्त्री ही माणूस व निसर्ग यामधील दुवा बनुन रहाते व निसर्गाच्या विनाशाला आव्हान देण्याचे बळ कधी शहरी – समाजाला कशी देते, हे आमच्या नर्मदा बचाओ ते घर बचाओ आंदोलनापर्यंत आम्हीही ठायी अनुभवले आहे. अशा आजच्या वास्तवाची जोड स्त्रियांच्या प्रेम, त्याग, सहिष्णुता, सहनशीलता व सृजनशीलता यासारख्या गुणविशेषांना मिळते, तेव्हा स्त्रियांच्या महत्तेची जाणीव होते. दहातोंडे सरांनी लेखांच्या व्यापक निवडीतून हीच जाणीव करून दिली आहे. तीही साध्या सोप्या कहानीवजा लेखनातून. लेखातून स्त्रीवाद म्हणावा पण वादातील रहावा असा स्त्री – पुरूष समतेचा विचार पुढे आला आहे. सरांनी एकप्रकारे समाजप्रबोधनाचेच कार्य केले आहे. कानाकोपऱ्यातून अडगळीतून बाहर काढलेली ही स्त्रियांची चरित्रे एक चारित्र्यवान समाज निर्माण करतील असा विश्वास आहे. महात्मा फुले, महर्षीं शिंदे, महर्षीं कर्वे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा गांधी. असो वा सावित्रीबाई, फातिमा शेख व ताराबाई शिंदे या सगळ्यांच्या जीवन शिक्षणाच्या मार्गावरचे दहातोंडे सरांचेही हे एक पाऊल आहे. ”
Reviews
There are no reviews yet.