Description
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचा समताधिष्ठित सामजिक पुनर्रचना हा पाया होता, आणि या कारणामुळेच बाबासाहेबांची चळवळ ही वैश्विक बनू शकली. भारतीय समाजात नंतरच्या काळात चळवळी निर्माण झाल्या आहेत. परंतु या चळवळींना दिशादिग्दर्शक मात्र निर्माण झाले नाहीत, ही मोठी खंत आहे. ह्याचा परिणाम असा झाला की, चळवळी केवळ विचारांच्या वाहक म्हणून कार्यरत राहिल्या. सामाजिक पुनर्रचनेचा पाया मिळाला तर याच परिवर्तनवादी चळवळी प्रेरक बनतील. मानवाच्या मानसिकतेचा तळाशी जाऊन शोध घेऊन भारतातील विशिष्ट सामाजिक परिस्थितीच्या संदर्भात रावसाहेबांनी मार्क्स-आंबेडकर यांचे विचार परस्परपूरक मानले. अशा समन्वयी विचारांचा वेगळा आदर्श भारतीय समाजासमोर उभा करून नवीन क्रांतीच्या तत्त्वज्ञानाची मांडणी केली.
Reviews
There are no reviews yet.