Description
- चार-पाच दिवसांपूर्वी मी एका भयंकर चक्रव्यूहात सापडलो होतो. एका बाजूला अस्पृश्यांचे राजकीय भवितव्य आणि दुसऱ्या बाजूला महात्माजीचे प्राणसंरक्षण पण आता मी या चक्रव्यूहातून बाहेर पडलो आहे आणि याचे बरेच श्रेय महात्माजींना दिले पाहिजे. मी राउंड टेबल परिषदेत हेच काम करीत असताना गांधीजीनी मला इतरांपेक्षा जास्त मदत केली. परंतु त्यावेळी त्यांनी माझी विचारसरणी नीटपणे लक्षात घेतली असती तर त्यांना हा उपासाचा खटाटोप करावा लागला नसता. पण आता त्याचे काय? आम्हा अस्पृश्यांपुढे असा प्रश्न आहे की, तुम्ही हिंदू जो हा करार करीत आहात तो नीटपणे पाळाल काय? (आवाज होय, होय.) तुम्ही सर्व हिंदू या कराराला एक पवित्र करार म्हणून मानाल व त्याप्रमाणे वागाल अशी मी आशा करतो.
Reviews
There are no reviews yet.