जग सत्य, ब्रह्म मिथ्या

162.00

Out of stock

पुस्तकाचे नाव जग सत्य, ब्रह्म मिथ्या
लेखक रमेश इंगोले
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १६०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १६० ग्रॅम

Description

जगात ज्या घटना घडतात त्या सत्य असतात.  कारण त्या आपण तपासून पाहू शकतो आणि कोणीही त्याला विद्न्यानाची कसौटी लावून पाहू शकतो.  तथागत  बुद्धांनी  हेच सांगितले आहे की, कोणताही विचार, कोणतीही घटना तुम्ही स्वत: अनुभवली  किंवा तुम्हाला  पटली तरच ती सत्य म्हणून स्वीकारा आणि जरा तुम्हाला वाटले की, हे बुद्धीला पटत नाही तर स्वीकारू नका. असे सांगणारा हा जगातील पहिला धर्म संस्थापक आहे.  नाही तर इतर धर्म  संस्थापक हे तुम्हाला ते स्वीकारण्यास भाग पाडतात. म्हणून या जगात जे आहे ते स्वीकारा आणि आणि वैद्न्यानिका दृष्टीने त्याची तपासणी करा. हे सत्य आहे. आणि त्यानुसार जो व्यक्ती जीवन जगतो त्याचे खरे जगणे आहे. नाही तर तुमच जीवन व्यर्थ आहे. कारण माणूस  म्हणून जीवन जगत असताना जर आपणास या जगाचे …… नसेल तर मग काय फायदा या मानवी जीवनाचा ? या पृथ्वीतलावर माणूस असा एकमेव प्राणी आहे की, जो त्याला पाहिजे तसे जीवन जगू  शकतो. नाहीतर तुम्ही इतर कोणताही प्राणी पहा तो मानवाच्या आधीन आहे. त्यामुळे तो पाहिजे तसे जीवन जगू शकत नाही. निसर्गाने जर एवढी बुद्धिमत्ता दिलेली आहे आणि अधिकार दिलेले आहेत तर त्याचा उपयोग का करू नये ? केलाच पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला वास्तव जीवन जगावे लागेल. हे जीवन जगण्यासाठी प्रथम तुम्हाला सनातनी विचार तुमच्या डोक्यातून बाहेर काढावे लागतील. ज्या भ्रामक संकल्पना आपणास आजपर्यंत सांगितल्या आहेत त्या झुगारून द्याव्या लागतील म्हणजे  तुम्हाला  जग सत्य काय आहे ते स्वीकारावे लागेल आणि त्यासाठी एकच मार्ग आहे तो म्हणजे तथागत बुद्धाचा धम्म  होय. यासाठी तुम्ही काही धम्माची दीक्षा घ्यायची आहे असेही नाही तर फ़क्त तथागताने सांगितलेला धम्म काय आहे आणि त्याचे विचार काय आहेत हे समजून घ्यावे लागतील. 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जग सत्य, ब्रह्म मिथ्या”

Your email address will not be published. Required fields are marked *