Description
डॉ. आंबेडकारांचे जीवन आणि त्यांच्या ध्येयवादाची संक्षिप्त ओळख
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म 1891 साली एका अस्पृश्य कुटुंबामध्ये झाला. सामाजिक अन्यायाविरोधात लढा उभारणारे ते आधुनिक भारतातील महान नेते होते. या छोट्याशा चरित्रामध्ये प्रसिद्ध विचारवंत गेल ऑम्वेट यांनी आंबेडकरांच्या प्रेरणादायी जीवनाची कहाणी सांगितली आहे. आंबेडकरांनी मिळविलेले शिक्षण, अस्पृश्यतेवर केलेली मात आणि आपल्या अनुभवाने आंतरराष्ट्रीय कायदेपंडित म्हणून मिळविलेली ओळख, बुद्धवादाच्या नव्या प्रणालीचे संस्थापक आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार हा त्यांचा प्रवास यामध्ये अतिशय सोप्या आणि गुंतवून ठेवणाऱ्या शैलीत मांडला आहे. आंबेडकरांचा तत्कालीन राष्ट्रीय नेत्यांबरोबर, विशेषतः गांधींबरोबर (भारतातील वंचित आणि शोषितांच्या स्वातंत्र्याशिवाय देश कधीही खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणार नाही.) याविषयावर केलला युक्तिवाद ऑम्वेट यांनी यामध्ये संदर्भासहित दिला आहे.
‘आंबेडकर प्रबुद्ध भारताच्या दिशेने’मध्ये एकविसाव्या शतकातील भारतात असणाऱ्या सामाजिक विरोधाभासांचे वास्तव आणि ते समजण्यासाठी एका राष्ट्रीय नेत्याने मांडलेला विचार, त्यासाठी आयुष्यभर उभारलेला अखंड संघर्ष यांचे चित्र डोळ्यासमोर उभे करून देणारा हृदयस्पर्शी अनुभव आहे.
प्रत्येक भारतीयाचे लक्ष आंबेडकरांनी का वेधून घेतले होते याचा यशस्वी पाठच जणू यातून मांडला गेला आहे.
Reviews
There are no reviews yet.