Description
इतिहास रचनेतील दृष्टी, साधन क्षेत्राची व्याप्ती, विविध परदेशी साधने, स्वदेशी साधने व त्यांची मीमांसा या बाबींवर शास्त्रशुद्ध कार्य करताना शिवकालीन लेखन पद्धतीचा सखोल आढावा इतिहासकार वा. सी . बेंद्रे यांनी या ग्रंथात घेतलेला आहे . साधनांचा दर्जा, शक पद्धती, सरकारी व् खाजगी पत्रे यांचा इतिहासातील उपयोग विस्तृतपणे नमूद करण्यात आलेला आहे. याशिवाय शकावल्या, कुळवटी, हवेली, बाडे, बखरी, पोवाडे, काव्य, ऐतिहासिक म्हणी, वाङ्मय, नाणी, शिलालेख, चित्रे, नकाशे, इमारती अशा छोट्यातील छोट्या बाबींचा उपयोग इतिहासामध्ये तसेच त्याच्या लिखाणामध्ये कसा करावा, याचे विवेचन देखील बेंद्रेनी शास्त्रीय पद्धतीने केले आहे.
इतिहास लेखनासाठी लागणाऱ्या पुराव्यांचा अभ्यास कसा करायचा ? शिवाय इतिहासकराची दॄष्टि नक्की कशी असायला हवी ? महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे इतिहास लेखक कसा असतो ? त्याची पात्रता व त्याचे दोष यावर बेंद्रे यांनी या ग्रंथात सखोल प्रकाश टाकलेला आहे. इतिहास लेखकाच्या स्वभावानुसार तसेच दृष्टिकोनानुसार तो इतिहास लिहित असतो. किंबहुना आजवर अनेक इतिहास लेखकांच्या बाबतीत आपल्याला ही बाब प्रकर्षाने जाणवते. हे निरीक्षण नव्वद वर्षांपूर्वीच्या ग्रंथांमध्ये बेंद्रे यांनी लिहिले होते इ विशेष !
इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी आणि इतिहासाला विद्न्यान म्हणून त्याच्याकडे बघण्याचा नवीन वैद्न्यानिक दृष्टिकोण देणारा ‘साधन चिकित्सा’ हा ग्रंथ.
Reviews
There are no reviews yet.