Description
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या व त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जुन्नर तालुक्यात लेखिका वास्तव्यास असून त्यांना एक वैचारिक असा वारसा त्यामुळे लाभला आहे. कविता लेखनाची त्यांना आवड असून निसर्ग, सामाजिक स्थिती, अज्ञान, दुःखवेदना या अशा अनेक विषयांवर त्यांनी आपल्या कविता लेखनातून भाष्य केले आहे.
‘जन्म घे रे… जोतीराया’ हा महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वैचारिक कृती आणि ज्ञानक्रांतीवर प्रकाश झोत प्रातिनिधीक कवितांचा संग्रह आहे. लेखिकेच्या दैनिक सकाळे या प्रसिद्ध वृत्तपत्रातील प्रगती या पुरवणीमध्ये ‘गाणं शिवाराचं’ या सदरामध्ये अनेक कविता प्रसिद्ध झाल्या असून त्या कवितांचा कवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. ग्रामीण जीवन आणि शेती, निसर्ग कविता हा त्यांच्या लेखनाचा व जिव्हाळ्याचा विषय आहे. ग्रामीण कवियत्री म्हणून त्यांचा नावलौकीक आहे.
Reviews
There are no reviews yet.