Description
”शूद्र लोक हे आर्य होते किंवा हिंदुस्थानचे मूळचे रानटी रहिवासी होते किंवा जमातींच्या संमिश्रणाने तयार झालेल्या टोळ्यांतील लोक होते हा प्रश्न वास्तविक सध्या फारसा महत्त्वाचा नाही. अगदी प्राचीन काळात शूद्र लोकांचा एक स्वतंत्र वर्ग निर्माण करण्यात आला आणि त्यांना समाजात चवथे किंवा शेवटचे स्थान देण्यात आले वरच्या तीन वरिष्ठ जातींची जी सथन होती त्यांच्यात आणि शूद्रात स्थानात पुष्कळचे अंतर ठेवण्यात आले होते शूद्र लोक प्रथमतः आर्य नव्हते हि गोष्ट आपण जरी मान्य केली तरी आर्यांच्या तीन जातींमध्ये त्यांचे संमिश्र विवाह इतक्या मोठ्या प्रमाणावर झाले कि मूळच्या शूद्र लोकांचे रूपांतर ‘आर्य लोक’ असे आत्तापर्यंत होत आलेले आहे. या असल्या रूपांतरामुळे शूद्रांचा काही बाबतीत तोट्यापेक्षा फायदाच जास्त झालेला आहे. हे पूर्वी दाखविण्यात आलेले आहे. आणि ज्या काही टोळ्यांना शूद्र म्हणून संबोधण्यात येते त्यांच्यात वास्तविकपणे ब्राम्हण व क्षत्रिय लोकांचे गुणावगुण जास्त ठळकपणे दृग्गोचर होतात. ब्राम्हण व क्षत्रिय लोकांच्या गुणावगुणांपेक्षा इतर लोकांचे गुणावगुण त्या टोळ्यांमध्ये अगदी कमी प्रमाणास पहावयास मिळतात. सारांश, इंग्लंडमधील सेल्टिक टोळ्या अँग्लो – सॅक्सन वंशात जशा मिसळून गेल्या त्याचप्रमाणे शूद्रांच्या टोळ्या इतर वंशांमध्ये मिसळून गेल्या आहेत. इतर वंशांमध्ये शूद्र टोळ्यांचे संमिश्रण इतके झालेले आहे कि, त्यांना जे पूर्वी स्वातंत्र्य होते ते अजिबात नष्ट झालेले आहे.”
Reviews
There are no reviews yet.