Description
या पुस्तकात महाभारतातील काही आगळ्यावेगळ्या स्त्रियांच्या जीवनातील वैशिष्ट्यपूर्ण घटनांचे विवेचन केले आहे. हि त्या स्त्रियांची समग्र चरित्रे नव्हेत. त्यांच्या जीवनातील त्या त्या घटनांचे हे समग्र मूल्यमापनही नव्हे. त्या घटना मांडताना येथे जे काही भाष्य केले आहे, ते त्या काळातील समाजव्यवस्थेची वा समाजधुरिणांची निंदा करण्यासाठी नव्हे. ज्या समाजाचे आचारविचार अजूनही आपल्या रक्तामांसात ठाण मांडून बसले आहेत, त्या समाजाचे मन समजावून घेण्याचा एक प्रयत्न आहे. या प्रयत्नाच्या ओघात तत्कालीन जीवनमूल्यांवर काही टीका झाली असलीच, तर ती स्वतःच्याच समाजावरची आणि म्हणून आत्म्परिक्षणात्मक आहे, असे म्हणता येईल.
Reviews
There are no reviews yet.