Description
अण्णाभाऊ साठे यांचे सबंध साहित्यच विद्रोही तत्वज्ञानावर उभे आहे. हे विद्रोही तत्वज्ञान त्यांना मार्क्स, गॉर्की, फुले, आंबेडकर यांच्याकडून मिळालेले आहे. या विद्रोही तत्वज्ञानातून प्रेरणा घेऊन अण्णाभाऊंनी मराठी साहित्याच्या भूमीत समाजपरिवर्तनाचा विचार पेरला. क्रांतीचा मळा फुलवला, सजवला. त्यामुळे आधुनिक मराठीतील महात्मा फुल्यांपासून चालत आलेल्या विद्रोही ललित साहित्याच्या प्रवाहाला अधिक सशक्त आणि व्यापक बनविणारे साहित्यिक म्हणून अण्णाभाऊ साठे महत्वाचे ठरतात.
शोषणाला नकार देणारी आणि समतेचा पुरस्कार करणारी विद्रोही सांस्कृतिक परंपरा बळीराजा, चार्वाक, महावीर, बुद्ध, कबीर, तुकाराम, मार्क्स, फुले- शाहू- आंबेडकर यांनी समृद्ध केली आहे. सर्व प्रकारच्या शोषणावर ‘घाव’ घालणारे अण्णाभाऊ साठे याच विद्रोही सांस्कृतिक विचारधारेचे वारसदार ठरतात.
Reviews
There are no reviews yet.