Description
उन्नत मनुष्यत्वाकडचा प्रवास….
धर्मानंद कोसंबींची तरुणपणीच संत तुकारामांशी वैचारिक भेट झाली आणि तुकाराम कोसंबींच्या दृष्टीने त्यांना बुद्धांकडे घेऊन जाणारा सेतू ठरले. तुकारामांचे बुद्धांशी असलेले अतिशय निकटचे सांस्कृतिक नातेच या घटनेला कारणीभूत झाले. बुद्धांनी माणसाच्या मनाला पूर्वी कधीही कोणीही दिले नसेल इतके सौदर्य दिले, सुगंध दिला. तुकारामांनीही कधी बुद्धांचे अनुसरण करीत, तर कधी स्वतंत्रपणे आणि स्वयंस्फूर्तीने मानवी मनाला सुंदर आणि सुगंधी बनविले. तथागत बुद्ध हे भारतीय संस्कृतीच्या क्षितिजावरचे सर्वात अधिक प्रसन्न व आनंददायक स्मित आहे आणि संत तुकाराम हा भारतीय समाजव्यवस्थेला अतिशय निर्मळ बनविणारा प्रवाही व तृषाशामक निर्झर आहे! या दोघांपुढे नतमस्तक होणे आणि त्यांना आपल्या हृदयात व मस्तकात धारण करणे म्हणजे उन्नत मनुष्यत्वाकडचा प्रवास सुरु करणे होय!
Reviews
There are no reviews yet.