Description
राज्यकर्ते मोगल असो की निजाम अथवा अन्य कोणी, पण देवगिरी जिंकण्यासाठी कठीणच, ती जबाबदारी निजामशहाने लखूजीराजे जाधवांवर सोपवली. जेथे शक्ती हात टेकते, तेथे युक्ती श्रेष्ठ ठरते ! जीवनाश्यक वस्तूंचा प्रचंड साठा करून ठेवण्याची क्षमता या किल्ल्यांची आहे. येथे फक्त चारा टंचाई होते. अशावेळी ‘शहनाई’ वाजवली जाते. तेव्हा गवताचे व्यापारी गवत घेऊन गडावर जात असतं. ही बाब लखुजींनी हेरली व गडाभोवती आपली विश्वासू माणसं पेरली. ‘तो’ शहनाईचा आवाज होताच, गवताच्या भाऱ्यात हत्यारे लपवून लखुजींची माणसं गडावर भुसली, वर जाताच लखुजींच्या आदेशाप्रमाणेच मुंडकेछाटणी सुरु झाली. आकस्मिक हल्ला मोगलांना परतवता आला नाही. त्यांनी हार पत्करली. विजयाची माळ निजामशहाने लखुजींच्या गळ्यात घातली. म्हणून देवगिरी राष्ट्रकूटांनी बांधला असला, तरी तो यादवांच्या नावानेच ओळखला जातो.
Reviews
There are no reviews yet.