वैद्यकायन

405.00

Out of stock

पुस्तकाचे नाव वैद्यकायन
लेखक अच्युत गोडबोले, अतुल कहाते, अमृता देशपांडे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ५७२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ५०४ ग्रॅम

Description

आपल्या चरक, सुश्रुत योपासून हिप्पोक्रॅटस, गेलन, विल्यम हार्वे, पाऊल ब्रोका, लुई पाक्षर, स्टीफन हेल्स, अलेक्झांडर फ्लेमिंग, वॉट्सन आणि क्रिक, डॉ. जॉन मर्फी या आणि अश्या अनेक वैज्ञानिक, डॉक्टर्स आणि सर्जन्स यांनी  वैद्यकाच्या इतिहासात अमुल्य योगदान दिले आहे. त्यांनी लावलेल्या शोधांचा आज प्रत्येक माणसाला उपयोग होतो. ‘वैद्यकायन’ हे पुस्तक म्हणजे अवघ्या वैद्यकविश्वाचा इतिहास आहे; यात वैद्यकाची मूलतत्त्वे आणि माणसे यांचा इतिहास आहे.

वैद्यकायन या ग्रंथाद्वारे अच्युत गोडबोले आणि सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन वैद्यकाचा हा इतिहास सामान्य वाचकांसाठी हळुवारपणे उलगडला आहे. आपल्या प्रत्येक पुस्तकातून गोडबोलेंच्या बद्धिमत्तेची, ज्ञानाची आणि आपल्या सहलेखकांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती ठळकपणे जाणवते. या जिव्हाळ्याच्या विषयावर वाचकांना मेजवानी दिल्याबद्दल लेखकत्रयीचे त्रिवार अभिनंदन. या पुस्तकास वैद्यकशास्त्रावरचा वेद किंवा बायबल म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही. प्रत्येकाने असे पुस्तक आपल्या संग्रही ठेवणे गरजेचे आहे.
डॉ. अनिल गांधी, पोटाच्या विकारांचे तज्ञ / लेखक

अच्युत गोडबोले व त्यांचे सहकारी सर्वसामान्यांच्या ज्ञानकक्षा व जाणिवा रुंदावणारे विविध विषय हाताळतात. यावेळी वैद्यकायन या ग्रंथमाध्यमातून त्यांनी मानवी आरोग्याशी संबंधित अनेक बाबींचा धावता आढावा घेतला आहे. यात अनादि काळापासूनचा वैद्यक इतिहास सादर केला आहे. त्यातून आधुनिक वैद्यकाच्या संकल्पना कशा प्रत्यक्षात आल्या व विकसित होत गेल्या, याचे टप्प्याटप्प्याने वर्णन करण्यात आले आहे. मला एक वैद्यक प्राध्यापक व तज्ञ उपचारक म्हणून लोकांना जे माहित असायला हवे असे वाटते, त्यातील अनेक बाबी यात समाविष्ट आहेत. रुग्णाप्त जेवढे स्वास्थ्यशिक्षित, जागरुक व समंजस, तेवढे त्यांना स्वास्थ्यक्षण करणे व आजारपणात काळजी घेणे नीट जमते. त्या दृष्टीने मराठी वाचकांना वैद्यकविज्ञानविषयक मूलभूत माहिती सहज देणारे असे हे लेखन आहे. सहाशे पानी वाचनात कुठेही कंटाळा येत नाही, उलट उत्कंठा वाढते. जनतेइतकेच वैद्यकक्षेत्रीय मंडळींनाही ते आवडेलच. वैद्यक विषयक समर्पक पुस्तकाची मातृभाषेतील कमतरता या पुस्तकाने भरुन काढलीये.
डॉ. पद्माकर पंडित. एमडी. औषधशास्त्रज्ञ. 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वैद्यकायन”

Your email address will not be published. Required fields are marked *