Description
विज्ञानकथांनी आता मराठीत चांगलंच मूळ धरलंय. निरंजन घाटे हे नाव विज्ञान कथांशी गेली बरीच वर्ष जोडलं गेलंय. मराठीत आज जे आघाडीचे लेखक आहेत, त्यांतले ते एक. विज्ञानाची जसजशी प्रगती होत चालली आहे. तसतसा त्या प्रगतीचा अंदाज घेऊन भविष्यकाळात या प्रगतीची दिशा कशी असेल, तिचा मानवी जीवनावर कोणता परिणाम होऊ शकेल आणि त्यामुळे मानवी परस्परसंबंध कसे बदलतील , याचा विचार या कथांमधून मांडलेला असतो. त्यामुळे वाचकही विचार करण्यास प्रवृत्त होतील, याचा प्रत्यय हा कथासंग्रह वाचताना निश्चितच येईल.

Reviews
There are no reviews yet.