Description
शाहिरी वाङ्मय प्रकारात ‘पोवाडा’ हा जाज्वल्य इतिहास मांडणारा, अंगावर रोमांच आणणारा, शौर्य सांगणारा असा कलाविष्कार आहे. अण्णा भाऊ साठे यांनी एकूण लिहिलेल्या पोवाड्यांत ‘नानकिन नगरापुढे’, ‘स्तालिनग्राडचा पोवाडा’, ‘बर्लिनचा पोवाडा’, हे आंतरराष्ट्रीय जाणिवांशी संबंधित आहेत, तर ‘बंगालची हाक’, ‘पंजाब- दिल्लीचा दंगा’, ‘तेलंगणाचा संग्राम’, ‘महाराष्ट्राची परंपरा’, ‘ अमळनेरचे अमर हुतात्मे’, ‘ मुंबईचे कामगार’, ‘काळ्या बाजाराचा पोवाडा’ असे विषय नावीन्य व राष्ट्र आणि महाराष्ट्रातील लोकजीवनाशी संबंधित भावस्पर्शी प्रसंग, काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटना या पोवाड्यांत आल्या आहेत.
‘महाराष्ट्राची परंपरा’ या पोवाड्यातून महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास व परंपरा, नेतृत्त्व, शौर्य, देशाभिमान, स्वाभिमान, या मातीतल्या माणसांची लढाऊ वृत्ती दिसते. मानवता, मातृभाषा व मातृभूमी प्रेम, समता, न्याय, बंधुता व राष्ट्रीय एकात्मतेचा पुकार असणारा हा अभ्यासपूर्ण असा पोवाडा आहे. ‘बंगालची हाक’ या पोवाड्यातून भूकेचा महादैत्य उठल्यामुळं बंगालला सावरण्यासाठी भारतीय युवकांना हाक दिली आहे. ‘काळ्या बाजाराचा पोवाडा’ यात काळा बाजार रोग आहे, असं संबोधून वाढलेल्या महागाईमुळं काय घडतं आहे, याचं यथार्थ व हृदयस्पर्शी चित्रण करात समाज प्रबोधन केलं आहे.

Reviews
There are no reviews yet.