बांधावरची झाडे

240.00

1 in stock

पुस्तकाचे नाव बांधावरची झाडे
लेखक व्ही. एन. शिंदे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २००
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २६० ग्रॅम

Description

बोर, हादगा, जांभूळ, शेवगा, चिंच, आंबा, आवळा, कडुलिंब, बाभूळ, साग या झाडांविषयी ज्ञान ललित माहितीचा लेखसंग्रह म्हणजे ‘ बांधावरची झाड़े’ हे पुस्तक.

डॉ.  व्ही. एन. शिंदे यांनी जाणीवपूर्वक घडविलेला हा विज्ञान ललित बंध आहे.  झाडांच्या शास्त्रीय माहितीबरोबरच त्यांचा व्याप्ती- पसारा, भूगोल, भाषिक संज्ञेचा वर्णपट त्यामध्ये निवेदिला आहे.  त्यामुळे त्यासा वस्तुनिष्ठ वैज्ञानिक माहितीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.  त्यासाठी त्यांनी विविध ज्ञान शाखांमधील माहितीचा भरगच्च आधार घेतला आहे.  झाडांचा अधिवास व परिसर विज्ञान विषयीचे हे कथन आहे.  त्यात शेती ज्ञानाबरोबर वनस्पतिविज्ञान आहे.  त्या त्या झाडांची व्यावहारिक उपयोगिता सांगितली आहे.  शिंदे यांच्या लेखनाचा महत्त्वपूर्ण विशेष म्हणजे झाडसृष्टीच्या  मानवनिर्मित बांधकामाचे कथन.  माणूस आपल्या कल्पना निरिक्षणाने सृष्टिवाचन करत त्यास मानवी रंगरूप देत आला आहे.  डॉ.  शिंदे यांच्या लेखनात मानवाने आदिकाळापासून झाडांविषयीचे रचलेले विहंग दर्शन आहे.  लोककथा, गाणी, दंतकथा, मिथके व आधुनिक साहित्यातील ही झाड दर्शने आहेत.  लोक व लिखित परंपरेच्या झाडवाचनाचा त्यात धांडोळा आहे.  एका अर्थाने मराठी संस्कृतीत उमटलेले झाडांचे हे बिलोरी रंग छाया दर्शन आहे.  त्यामुळे बाधावरील हे झाडमायादर्शन मनोहारी ठरेल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बांधावरची झाडे”

Your email address will not be published. Required fields are marked *