Description
विज्ञानाला आज जगात मोठी प्रतिष्ठा आहे. या प्रतिष्ठेमागचे एक कारण म्हणजे गेल्या चारशे वर्षात विज्ञानाने फार मोठे यश मिळवले आहे. मानवाच्या भौतिक, सांस्कृतिक, आर्थिक प्रगतीत फार मोठे योगदान दिले आहे; आणि हे कारण सर्वमान्य होण्यासारखे आहे. या प्रतिष्ठेमागे दूसरे एक कारण ही आहे, ते म्हणजे विज्ञान हे वस्तुनिष्ठ असते, ते केवळ वस्तुनिष्ठ, प्रायोगिक कसोट्यांच्या आणि शुद्ध तर्काच्या जोरावरच पुढे जाते हा सर्वसाधारण समज. हा समज खरा आहे का ? विज्ञानाचे स्वरूप काय ? त्याविषयी तज्ज्ञ काय म्हणतात ? विज्ञान आणि तंत्रज्ञान ही दोन्ही अलीकडे संयुक्तपणेच, एक जोड़शब्द म्हणून वापरली जातात. ते योग्य आहे का ? त्यांच्यात काही भेद आहेत का ? येत्या शतकात विज्ञान – तंत्रज्ञान मानवाला त्याच्या समस्यांवरती मात करण्यासाठी कितपत मदत करेल ? असे प्रश्न विज्ञानप्रेमींना नेहमीच पडतात. हे पुस्तक वरील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचे स्वरूप आणि त्यांचे काही आनुषंगिक पैलू यांचा मागोवा घेण्याच्या लेखकाच्या प्रयत्नातून साकारले आहे.

Reviews
There are no reviews yet.