Description
विषाणू (व्हायरस) हे जीवसृष्टीतले बहुधा सर्वात रहस्यमय जीव असावेत, इतके की त्यांना सजीव म्हणायचं का, असाही प्रश्न आहे. त्यांच्या बाबतीत सर्वच गोष्टी, त्यांच्याविषयी निर्माण होणाऱ्या प्रतिक्रियाही टोकाच्या आहेत. पण बहुतेक वेळा त्यांच्या बाबतीतल्या प्रत्येक सर्वपरिचित सत्याच्या विरुद्ध सत्यही अस्तित्त्वात असतं. त्यांचं विश्व इतकं गुंतागुंतीचं आणि वैविध्यपूर्ण आहे की त्याचा विचार एक स्वतंत्र साम्राज्य म्हणून करणंच श्रेयस्कर आहे. आपण त्यांना सजीव मानत असलो किंवा निर्जीव, जीवनदायी किंवा जीव घेणारे, त्यांच्या व्यवहारांमध्ये एक मोहक सौंदर्य आणि एक प्रकारचा डौल आहे
‘मानवी सभ्यतेला आणि पृथ्वीतलावरच्या जीवसृष्टीला विषाणुंनी ज्या प्रकारे आकार दिला आहे, हे आता कुठे आपल्याला उमजू लागलं आहे. आपल्यापैकी प्रत्येकावर ज्या अदृश्य शक्ती परिणाम करत असतात, त्यांची भुरळ घालणारी झलक प्रणय लाल यांच्या पुस्तकामध्ये आपल्याला दिसते. आणि ज्ञानात भर टाकणारं !’
‘आपल्यापैकी बहुतेक जण विषाणुंकडे रोगकारक सूक्ष्मजीव म्हणून पाहतात, परंतु ते निसर्गातले सर्वाधिक वैविध्य असलेले, सर्वाधिक संख्येने आढळणारे सूक्ष्मजीव आहेत, जे सजीव आणि निर्जीवांच्या सीमारेषेवर वास करतात. वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या सुंदर रेखाचित्रांनी सजलेल्या या पुस्तकात प्रणय लाल आपल्याला विषाणुंच्या जगताची भव्य यात्रा घडवतात आणि त्यांचा इतिहास, आणि निसर्गात ते बजावत असलेल्या विभिन्न विस्मयकारी भूमिकेचं दर्शन घडवतात. तरुण वाचकांसह, ज्यांना ज्यांना निसर्गात रस आहे, त्या सर्वांना हे पुस्तक अतिशय आनंद देईल.
Reviews
There are no reviews yet.