अर्थात : अर्थशास्त्राचा इतिहास, सिद्धांत आणि अर्थशास्त्रज्ञांची रंजक चरित्रं यांची सफर

700.00

1 in stock

पुस्तकाचे नाव अर्थात : अर्थशास्त्राचा इतिहास, सिद्धांत आणि अर्थशास्त्रज्ञांची रंजक चरित्रं यांची सफर
लेखक --
ISBN 9789328033522
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ५४२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ४५० ग्रॅम

Description

हे पुस्तक एकाच वेळी अनेक पातळ्यांवर रचलेलं आहे. एका पातळीवर इथे आधुनिक अर्थशास्त्राची तत्त्वं अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितली आहेत. दुसऱ्या पातळीवर हा चक्क एक सामाजिक इतिहास आहे. म्हणजे अगदी पुराणकाळापासून, मध्ययुगातल्या सरंजामशाहीपासून, भांडवलशाहीच्या उगमापर्यंत आणि अगदी २००० सालाच्या दुसऱ्या दशकाच्या शेवटपर्यंतच्या काळाचा हा अर्थशास्त्रीय इतिहास आहे. पैसा कसा सुरू झाला, बँकिंग, कंपन्या, स्टॉक  एक्स्चेंजेस  वगैरेही कशा सुरू झाल्या हे सगळं यात आहे.

तिसऱ्या पातळीवर यात अर्थशास्त्रज्ञांची अतिशय विस्मयकारक चरित्रंही वाचायला मिळतील.  यात अर्थशास्त्रातल्या वेगवेगळ्या विचारसरणींची आणि त्यांच्यातल्या वादांविषयीचीही खोलवर चर्चा आहे आणि त्यातलं काय बरोबर आणि काय चूक आहे त्याचा निर्णय वाचकांवर सोडलेला आहे.

या पुस्तकाच्या सुरुवातीला अर्थशास्त्राच्या इतिहासाचा थोडक्यात आढावा घेतलाय आणि नंतर  ‘अर्थशास्त्राचा गाभा’ या विभागात अर्थशास्त्राची तत्त्वं अगदी सोप्या शब्दांत सांगितली आहेत.

त्यानंतर अर्थशास्त्राचा इतिहास पाच भागांत सांगितलाय. शेवटचा विभाग आजच्या प्रश्नांसाठी राखून ठेवलाय.

या पुस्तकामुळे निदान काही वाचकांना तरी अर्थशास्त्राचा जास्त खोलवर अभ्यास करावा असं वाटलं, त्यातलं चैतन्य जाणवलं, त्यात जगाला दिपवून टाकेल असं संशोधन करावंसं वाटलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातले महत्त्वाचे प्रश्न आपले आहेत असं वाटून ते सोडवावेसे वाटले तरी या लिखाणाचं चीज होईल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अर्थात : अर्थशास्त्राचा इतिहास, सिद्धांत आणि अर्थशास्त्रज्ञांची रंजक चरित्रं यांची सफर”

Your email address will not be published. Required fields are marked *