Description
“घागर फुंकता फुंकता माझ्या अंगात संचारल्यासारखं झालं. मला काय होतं ते कळेना… सगळे दुर्गादेवी समजू लागले… अन् माझं जीवनच बदलून गेलं. मला जे जे हवं ते ते मिळू लागलं. मूल होत नव्हतं. मुलाच्या हव्यासानं एका देखण्या भक्ताची निवड केली. नवरा किंवा सासू विरोध करत नाही हे लक्षात आल्यानंतर मलाही मोह आवरेना. पुढे पाहिजे तो पुरुष… आता मला दोन मुलं आहेत… कशाचीच ददात नाही… देवी म्हणून काहीही केलं तरी चालतं. पण सामान्य स्त्रीनं मात्र ती उपाशी आहे, भुकेली आहे म्हणून चौकटीबाहेरचा भाकरीचा तुकडा खाल्ला तरी चालत नाही, असा हा समाज आहे. ”
( गाजलेल्या मध्यमवर्गीय प्रतिष्ठित देवीचा भांडाफोड केल्यानंतरची तिची कैफीयत.)
असे अनेक अंधश्रद्धेचे प्रकार आपल्या समाजात पाहायला मिळतात. आणि अनेक लोक त्यांना बळीसुद्धा पडतात. समाजात घडणाऱ्या संमोहनशास्त्र, भूत, जादूटोणा, देवी अंगात येणे, कौल लावणं, सापाचा मंत्र, अशा अनेक विषयांचं शास्त्रीय विवेचन करणारं सोपं, सुलभ, ओघवतं पुस्तक.
Reviews
There are no reviews yet.