Description
रमाईचा त्याग, सहनशीलता, कारुण्य यावर आत्तापर्यंत बरेच लेखन झाले आहे. काळीज छिन्न – विछिन्न करणारे प्रसंग रमाईवर ओढवतात. परिस्थिती तिला बालवयातच प्रौढ़ व्हायला भाग पाड़ते. बालपण जगू देत नाही. संसाराचं ओझं डोक्यावर घ्यायला लावते. रमाईसुद्धा न डगमगता परिस्थितीशी दोन हात करते. हे बळ कुठून येते? ही शक्ती कुठून येते? हे प्रश्न जेव्हा समोर उभे राहतात तेव्हा कळतं की, रमाई नुसती त्यागाची, सहनशीलतेची किंवा कारुण्याची प्रतिमा राहत नाही तर ती त्यापलीकडची आहे.
Reviews
There are no reviews yet.