Description
मी काही पाठ्यपुस्तके लिहिणारा लेखक नव्हे तर वाचकाला नव्या विज्ञानाची, नव्या तंत्रज्ञानाची झलक दाखवायची; त्याला समजेल अशा भाषेत, त्याचं कुतूहल जागृत करेल अशा प्रकारे माहिती द्यायची, हा माझा उद्योग आहे. नॅनो तंत्रज्ञानाबद्दल अशा प्रकारेच माहिती द्यावी. त्या तंत्रज्ञानाचा इतिहास सांगून मग सद्य:स्थितीत काय चालू आहे? या तंत्रज्ञानाचा विकास कुठल्या दिशेने होऊ शकेल आणि त्यातील शक्यता काय आहेत, हे वाचकांपुढं सादर करणं, हा माझा छंद आहे. तो इथं ही पूर्ण करायला वाव आहे हे लक्षात येताच मी नॅनो तंत्रज्ञानासंबंधीचे संदर्भ गोळा करायला सुरवात केली. ते वाचून, तसंच या क्षेत्राशी संबंधित काही परिचितांशी संपर्क साधून हळूहळू मी या पुस्तकाची आखणी केली. हे तंत्रज्ञान सर्वसाधारणपणे कशा प्रकारचं आहे, ते कुठल्या क्षेत्रांमध्ये प्रभावी ठरण्याची शक्यता आहे आणि त्यासा विकास कोणत्या दिशेने होतो आहे इतपत ज्ञान वाचकाला प्राप्त होईल, हा या पुस्तकाचा उद्देश्य आहे. तो सफल झाला की नाही हे वाचकांनीच ठरवायचं आहे.
Reviews
There are no reviews yet.