Description
” वयाच्या विसाव्या वर्षी पुण्यासारख्या सनातन्यांच्या बालेकिल्ल्यात टारगटांच्या टिंगलटवाकाळ्या आणि निंदानालस्ती सहन करून आणि प्रसंगविशेषी अंगावर आलेल्या धंटिंगनाच्या मुस्काटात हाणून सुद्धा! प्रौढ मुलींना प्रशिक्षण देण्याचे त्यांनी केलेले दिव्य, ज्योतिबासारख्या प्रखर ध्येयवेड्या क्रांतिपुरुषासोबत सतत ५० वर्षे काट्याचा अणीवर वैयक्तिक प्रपंच तोलून परिसरातल्या साऱ्या साधनवंचितांचा संसार यशस्वी करण्यात त्यांनी दाखविलेले कर्तृत्व, ज्योतिबांच्या अंत्ययात्रेतही आडमुठ्या नातलगांच्या नाकावर टिच्चून टिटवे धरण्यातून त्यांनी दाखविलेले लोकविलक्षण धैर्य, इतकेच नव्हे; तर पतिनिधनानंतरही खचून न जाता, पतीच्या सत्यधर्म प्रसार कार्यात स्वत:ला झोकून देण्याची त्यांची तयारी आणि साथीच्या रोगाने ग्रस्त झालेल्या रुग्णांच्या सेवेत त्यांनी अखेरीस ठेवलेला देह या एकाहून एक लोकविलक्षण घटना विचारात घेता, सावित्रीबाईंच्या प्रगल्भ, समृद्ध व भव्योदात्त अशा व्यक्तितवापुढे कोणीही सहृदय भारतीय आदराने नतमस्तक होईल.”

Reviews
There are no reviews yet.