Description
ऑटिझमवरचं मराठीतलं पहिलंच सविस्तर पुस्तक
या पुस्तकामध्ये –
१. ऑटिझम हा काय प्रकार आहे ?
लक्षणं, उपाय, थेरॅपीज आणि औषधं
२. ऑटिझमचा इतिहास आणि त्यातले संशोधक
३. ऑटिझम आणि कला-चित्रपट, कथा, कादंबऱ्या
४. ऑटिझम आणि सेलिब्रिटिज
अशा विविध अंगांनी सर्वसमावेशक माहिती आणि ज्ञान या पुस्तकात सापडेल. ऑटिस्टिक मुलांसाठी शाळा आणि वेगवेगळ्या निवासी संस्थांची माहितीसुद्धा या पुस्तकात दिलेली आहे.
…………….
आज ऑटिझमचं प्रमाण जन्माला येणाऱ्या दर ५४ मुलांपैकी एक आहे. जेव्हा पालक जिवंत नसतील तेव्हा अशा दशसहस्त्र किंवा लाखो मुलांचं / माणसांचं पुढे काय होणार ? हा एक मोठा प्रश्नच आहे, ‘फोरम फॉर ऑटिझम’ या संस्थेनं पूर्वी एक अहवाल लिहिला होता. त्यामध्ये म्हटलं होतं की अशा संस्था जर निघाल्या नाहीत तर पालकानंतर अशी लाखो माणसं रस्त्यावरून फिरतील, आणि हे भयानक चित्र आहे. त्यामुळे समाजानं आणि सरकारनं याविषयी खडबडून जागं होऊन काहीतरी करण्याची गरज आहे.
हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक, पालक, व्यावसायिक, समुपदेशक आणि स्पेशल एज्युकेटर्स अशा सगळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि जरूरीचं आहे.
Reviews
There are no reviews yet.