Description
लोकहितवादींचे भिन्न विषयांवरचे विचार संकलित करून मांडले आहेत शतपत्रांमध्ये लोकहितवादींनी १०८ पत्रे लिहिली आहेत. त्यात धर्म, राजकारण, समाजकारण, अर्थशास्त्र, इतिहास, इंग्रजीविद्या, संस्कृतविद्या इत्यादी अनेक विषयांवरचे त्यांचे विचार आले आहेत. हे लेखन प्रासंगिक असल्यामुळे त्यात वरील विषयांवरचे त्यांचे विचार आले आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने सोयीचे व्हावे म्हणून त्याचे वर्गीकरण करून भौतिक विद्या, धर्मशास्त्र, जातिभेद, स्त्रीजीवन, इंग्रज आणि राजयसुधारणा आणि आर्थिक विचारसरणी अशा विभागांत त्या त्या विषयावर विचार संकलित केले आहेत. असे करताना शक्यतो लोकहितवादींच्या शब्दांतच ते देण्याचा प्रयत्न केला आहे, लोकहितवादींची मूळ भाषा असेल तेथे त्यांचे उदगार अवतरणात दिले आहेत. लोकहितवादींच्या आधीच्या काळचे मतप्रवाह, पन्नास वर्षांनंतरचे मतप्रवाह, त्यांच्या काळची परिस्थिती हे सर्व उदबोधनासाठी आलेले संपादनातील हे धोरण ध्यानात ठेवून विद्यार्थ्यांनी शतपत्रांचा अभ्यास करावा.

Reviews
There are no reviews yet.