क्रांतिसिंह नाना पाटील

18.00

Out of stock

पुस्तकाचे नाव क्रांतिसिंह नाना पाटील
लेखक नवनाथ शिंदे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ४८
आकार ४.५ * ७ इंच
वजन ६० ग्रॅम

Description

…२८ ऑगस्ट १९४२ रोजी तासगाव तालुक्यातील भोसे या गावी जनार्दनपंत पांडुरंग कुलकर्णी नावाचे सर्कल इन्स्पेक्टर यांना सरकारशी एकनिष्ठ राहू नका याविषयी सूचित करण्यात आले. तुम्ही सरकारची गुलामी करण्यापेक्षा आमच्याबरोबर चळवळीत सामील व्हा; पण त्यांनी स्पष्ट नकार दिला. यावर चिडून लोकांनी त्यांची धिंडच काढली.
२७ नोव्हेंबर १९४२ रोजी सरकारी धान्याचे गोदाम लुटले. त्यानंतर ८ डिसेंबर १९४२ रोजी शेणोली रेल्वेस्टेशन जाळले. हि आग विझते न विझते तेच ११ डिसेंबर १९४२ रोजी शिरवडे रेल्वेस्टेशन जाळले. २१ जाने १९४३ रोजी चरण येथील चावडीतील सर्व शेतसारा लुटण्याचे काम भूमिगतांनी केले.
या छोट्या-मोठ्या हल्ल्याने फार काही साध्य होत नाही, यातूनच धुळे खजिन्याची वाहतूक करणारी रेल्वे लुटायची योजना आखली गेली. नाना व नानांचे सहकारी जी.डी.लाड, नागनाथअण्णा नायकवडी यांच्यासह स्वातंत्रसैनिक धोंडीराम माळी, निवृत्ती कळके, शंकर माळी , आप्पा पाटील, किसान पाटील यांनी अत्यंत कठीण असलेली हि योजना सत्यात उतरवण्याचे ठरवले.
ऐन रणरणत्या उन्हात १४ एप्रिल १९४४ रोजी सर्व्हिस गाडीमधून खजिना नंदुरबारला जाणार असल्याची बातमी भूमिगतांना मिळाली. ठरल्याप्रमाणे चिमठाना स्टेशनवर गाडी थांबल्यावर चार क्रांतिकारक लग्नाला चालले आहे, असे सांगत रेल्वेत चढले. गाडी पुढच्या दिशेने चालू लागल्यावर जंगलामध्ये तिची गती एकदम कमी झाली कारण रेल्वेच्या या मार्गावर जी.डी.लाड बापू आणि नागनाथअण्णा नायकवडी यांचे नाट्यमय भांडण सुरु होते. गाडीची गती कमी झाल्याबरोबर आतील क्रांतिकारकांनी इशारा केला. त्याबरोबर सर्वांनी खजिन्यावर हल्ला केला. दहा-पंधरा मिनिटांत सर्व खजिना रिता करून अनवाणी पायांनी पैशाची गाठोडी घेऊन हातातल्या बंदुका सावरत पळत सुटले. मात्र, पोलिसांना खबर लागली. थोडीशीही उसंत न घेता घोड्यावरून पाठलाग करायला सुरुवात केली. लवकरच त्यांनी क्रांतीकारकांना गाठले. पोलीस आणि क्रांतिकारक यांच्यात गोळ्यांची चकमक उडाली. या चकमकीत नव्या दमाच्या पोलिसांची थकलेल्या क्रांतिकारकांनी चांगलीच हुर्रे केली. त्यांच्यावर मत करून क्रांतिकारकांनी त्यांना कात्रजचा घाट दाखवला आणि आपली योजना यशस्वी केली….

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “क्रांतिसिंह नाना पाटील”

Your email address will not be published. Required fields are marked *