Description
सर्व ग्रामासि सुखी करावे । अन्न-वस्त्र- पात्रादि दयावे ।
परि स्वतः दुःखचि भोगावे । भूषण तुझे ग्रामनाथा ! ॥
कष्ट करोनि महाल बांधसी । परि झोपडीही नाही नेटकीशी ।
स्वातंत्र्याकरिता उडी घेशी । मजा भोगती इतरचि ॥
ऐशा भोळ्या शंकरासि । सौख्य लाभावे सर्व देशी ।
मानवाची पूर्णता तुजसी । प्राप्त व्हावी मना वाटे ॥
म्हणोनि केली ‘ग्रामगीता’ । जागृत व्हाया ग्राम-देवता ।
संबंध यावा सागर-सरिता । ऐसा तुझा सर्वांशी ॥
तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो । सकळांचे लक्ष तुजकडे वळो ।
मानवतेचे तेज झळझळो । विश्वामाजी या योगे ॥
म्हणोनि तुजचि करितो अर्पण । तू विश्वाचे अधिष्ठान ।
तुझेचि व्हावे आधी उत्थान । विश्वामाजी म्हणोनिया ॥
ऐसेचि होवो जनी वनी । संतोष होईल माझिया मनी ।
मित्रत्व वाढो त्रैभुवनी । तुकड्या म्हणे ध्येय हेचि ॥
Reviews
There are no reviews yet.