Description
कामिल पारखे
पत्रकार, लेखक, अनुवादक आणि ब्लॉगर
विविध इंग्रजी दैनिकांत बातमीकर आणि उपसंपादक म्हणून कार्य. गोव्यात पणजी येथील द नवहिंद टाइम्समध्ये पत्रकारितेच्या व्यवसायास सुरुवात. लखनौ आणि बल्गेरियाची राजधानी सोफिया येथे पत्रकारितेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला, त्यानिमित्ताने रशियाचा दौरा. गोआ युनियन ऑफ जर्नलिस्टर्सचे माजी सरचिटणीस, लोकमत टाइम्स (औरंगाबाद), पुण्यातील इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया आणि सकाळ टाइम्स या वृत्तपत्रांत नोकरी. महाराष्ट्र चरित्रकोश, ख्रिस्ती मिशनरींचे योगदान, गावकुसाबाहेरचा ख्रिस्ती समाज, दलित ख्रिश्चनांचा आरक्षणासाठी लढा, घोगरगावचे जाकीयरबाबा, अमेरिकेतील वेश्याव्यवसाय (अनुवाद) वगैरे तेरा मराठी आणि इंग्रजी पुस्तके प्रकाशित.
Reviews
There are no reviews yet.